0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुंबई महानगर क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मंत्री श्री. शिंदे हे ऑनलाईन उपस्थित होते, तर यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. . राजीव, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रकल्प, वरळी-शिवडी कनेक्टर, प्रस्तावित नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टर, कल्याण रिंग रोड प्रकल्प या प्रकल्पांचे सादरीकरण झाले आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

Post a Comment

 
Top