0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसआज शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे   महापालिका कार्यक्षेत्रात उद्या दिनांक-१९-०५-२०२१-रोजी महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था बंद राहील.शासनाकडून लस साठा उपलब्ध झाल्यावरच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले जाईल.

      केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने,कोविशिल्ड लसीचा प्रथम डोस घेतल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी-६-ते ८-आठवडयावरुन -१२-ते-१६ आठवडे असा केला असल्याने  कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४-दिवस झाले असतील अशा नागरिकांनाच  कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस शासनाकडून  कोव्हिशिल्ड लसीचा साठा  उपलब्ध झाल्यावरच मिळणार आहे.

       राज्य शासना कडून प्राप्त झालेल्या  सूचनांनुसार १८-४४-वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे .

Post a Comment

 
Top