web-ads-yml-728x90

Breaking News

श्रमकल्याण युग मासिकातून कामगार, मालक, शासन समन्वय साधण्यात येईल – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे श्रमकल्याण युग हे मासिक राज्याच्या कामगार विभागाचे प्रतिनिधित्व करणारे असावे. ज्यातून कामगार, मालक, शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यात येईल, असे मत कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त श्रमकल्याण युग मासिकाचे प्रकाशन आणि १० वी व १२ वी च्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त ११२ कामगार पाल्यांचा गुणगौरव सोहळा ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. त्यात श्री.मुश्रीफ यांनी लिखित संदेश पाठवून आपले मत व्यक्त केले.कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंघल यांच्या हस्ते मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, कामगार उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोडबोले, मीडिया आर अँड डी.चे संचालक दिलीप कवळी, सुप्रसिद्ध करिअर काऊंसिलर स्वाती साळुंखे आदी मान्यवर यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब आणि फेसबुकवर करण्यात आले.

No comments