web-ads-yml-728x90

Breaking News

खाजगी बस एस.टी.च्या ताफ्यात आल्यास आंदोलन "महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एस.टी.)ने सुमारे ५००लालपरी बसेस एस.टी.च्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतल्याचे कळताच महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने आक्रमक मुमिका घेत सदरचा निर्णय तात्काळ रद्द करण्याबाबत तसेच एस.टी.व एस.टी.कामगारांच्या समस्या सोडवण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ऊद्धवसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी यांच्या सुचनेवरुन निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमुद एस.टी.च्या बसताफ्यात सुमारे५००खाजगी बसेस भाडेतत्वावर आणण्याचा निर्णय घेतला असुन खाजगी बसेस ज्या क्षेत्रात येतील त्या क्षेत्राच्या डेपोची जागा व यांत्रिक विभाग देखभालकरीता वापरण्यात येण्याच्या निर्णयास विरोध दर्शवला असुन तसे झाल्यास ताफ्यातील एकही खाजगी बस रस्त्यावर धाऊ देणार नसल्याचा विनंती वजा इशारा दिला आहे.

त्याचबरोबर नविन एस.बसेस खरेदीकरीता तसेच एस.टी.कामगारांच्या २०१६ते२०२०रखडलेल्या कामगार कराराकरीता १०हजार कोटी रुपयाची मदत येऊन प्रतीवर्ष एस.टी.करीता अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करण्यात  यावी,कोरोना महामारी सारखे प्रसंग ऊद्भवल्यास एस.टी.च्या ऊत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याकरीता म.न.रा.प.का.सेनेने सुचवलेल्या पत्रांनुसार मालवाहतुक तथा एस.टी.च्या मोकळ्या जागेत एस.टी.च्या मालकी हक्काचे लघुऊद्योग ऊभारुन एस.टी.ला बळकटी द्यावी.

एस.टी.कामगारांना माहे डिसे.२०१९पासुन महागाई भत्ता मिळाला नाही तो देण्यात यावा.संपुर्ण भारतात एस.टी.कामगारांना कमी वेतन असल्यामुळे मुलांचे शिक्षण,आरोग्य व विवाहांकरीता एस.टी.कामगार कर्जबाजारी झालेले असल्याने त्यांची कर्जे माफ करण्यात यावे.तसेच कोरोनामध्ये सेवा देणार्‍या एस.टी.कामगारांचा "कोव्हीड योद्धे"म्हणुन सन्मान करण्यात येऊन कोरोनामुळे मृत झालेल्या एस.टी.कामगारांच्या कुटूंबांना जाचक अटी रद्द करुन त्यांना ५०लाख विमा देऊन त्यांच्या मुलांला अथवा वारसास नौकरी देण्यात यावी इत्यादी समस्यांवर,दखल घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात यावा.अशा आशयाचे निवेदन दिले असुन एस.टी.च्या हितास बाधक असणार्‍या बाबींंचा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचा तिव्र विरोध असल्याचा ऊल्लेख केला आहे.सदर निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदिप गायकी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.एस.टी.व एस.टी.कामगारांकरीता म.न.रा.प.का.सेना सर्देव तत्पर असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदिप गायकी यांनी वृत्तपत्र पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती मध्ये व्यक्त केले आहे.

No comments