0

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मंत्रालय, मुंबई

राज्यात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्वतंत्र पथक करावे अशा सूचना विभागाला दिल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.जालना येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी याबाबत सांगितले. श्री. टोपे म्हणाले, काळी बुरशी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना पाठोपाठ हे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. मात्र त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभग प्रयत्न करीत आहे.या आजारावरील रुग्णांसाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, न्युरोसर्जन, प्लास्टीक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते. प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असे नाही. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top