Breaking News

विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – विरार

राज्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहे. विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत.  (Virar Covid Hospital fire)

आयसीयू वॉर्डात भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

 

No comments