0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

प्रतिदिन तीस दशलक्ष लिटर क्षमतेची वाघोली पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस हस्तांतरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक झाली. वाघोली पाणीपुरवठा योजनेचा लाभ पिंपरी-चिंचवड शहराला मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही गतीने करावी, असे सांगून या कामी लोकप्रतिनिधी व महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केल्या.बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top