web-ads-yml-728x90

Breaking News

फोटोमधील हुबेहुब चित्र दगडमुर्ती साकारणारे मुरबाड जांबुर्डेचे कलाकार कांताराम भोपी यांचे सर्वत्र कौतुक

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे

आज आपण बरेच कलाकार पाहिले  त्यांची कला पाहिले त्यांनी काढलेली मुर्ती पाहिले याच धर्तीवर मुरबाडच्या जांबुर्डे येथे सुध्दा असाच हुबेहुब चित्रणाचे दगडात साकारणारे मुर्ती बनवण्याचे काम करत आहेत.जांबुर्डे या गावातील कांताराम भोपी एक सुप्रसिध्द कलाकार…!

ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्याचे सुपुत्र कांताराम भोपी यांनी मुरबाड तालुक्याचे नांवलौकीक केल्याचे चित्र दिसत आहे.चक्क बाहेरील प्रदेशातुन येणारे ऑर्डर या मुरबाडच्या जांबुर्डे गावातून पुर्ण केली जातात.हुबेहुब फोटोतील महान व्यक्ती,नेते,देवदैवत यांचे साक्षात जणू समोर असल्याचा भास होतो असे दगडातुन मुर्ती घडवून देण्याचा काम कांताराम भोपी यांनी केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल अनेक सामाजिक संस्था यांनी घेवुन त्यांना विविध क्षेत्रातुन पुरस्कार सुध्दा मिळाले असल्याचे स्वता मुर्तीकार कांताराम भोपी यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.त्यांचा वसा त्यांच्या कुटूंबीयांनी सुध्दा घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments