0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांसह विविध प्रकल्पांचा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. सर्व कामे नियोजनानुसार वेळेत आणि शक्य तेवढ्या जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.काल झालेल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) तथा जल अभियंता अजय राठोड, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलनि:सारण) श्री. कमलापूरकर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) राजेंद्र तळकर आदी सहभागी झाले होते.महानगरपालिकेच्यावतीने सुरु असलेली निरनिराळी कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. कोरोना  संसर्ग परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे करताना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना सुयोग्य प्रकारे अंमलात आणाव्यात, तसेच संबंधित कामांच्या नियोजनावर विपरित परिणाम होणार नाही यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

 

Post a comment

 
Top