web-ads-yml-728x90

Breaking News

भिनार शासकीय कोविड सेंटरला सोनाळे ग्रा.पं.सदस्यांकडून ५१ हजारांची मदत

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी

कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटरमधील सुविधेवर मर्यादा येत आहेत. बेड,आँक्सिजन सिलेंडर, मास्क, सॅनिटायझर यासारख्या वस्तूंची गरज भासत असल्याने दानशूर व्यक्तींनी शासकीय कोविड केअर सेंटरमधील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ.नितीन मोकाशी यांनी केले.तालुक्यातील भिनार आश्रमशाळा येथे सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटरसाठी सोनाळे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्यांकडून ५१ हजार रुपयांची मदत डॉ.नितीन मोकाशी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.यावेळी देवा ग्रुप फाऊंडेशन सचिव तानाजी मोरे,उपसरपंच अनंता वाकडे,समाजसेवक सुनिल हरड,समाजसेवक विश्वनाथ थळे,संजय थळे सदस्य, समाजसेवक श्रीकांत तरे,लैलास पाटील,सदस्य अक्षय पाटील, डॉ.जाधव व डॉ.वारघडे उपस्थित होते.

1 comment:

  1. खूप सुंदर आज सर्वांनी मदतीचा एक पुढे करण्याची नितांत आवश्यकता आहे.....🙏🙏🚩🚩🚩

    ReplyDelete