web-ads-yml-728x90

Breaking News

राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेशापर्यंत तहकुब

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे व पालघर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये श्री. आर. एम. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दिनांक 10 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी नव्याने जारी केलेल्या निर्देशानुसार दिनांक 10 एप्रिल, 2021 रोजीची "राष्ट्रीय लोकअदालत'' पुढील आदेशापर्यंत तहकुब (Postponcd) करण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसरा शनिवार, दिनांक 10 एप्रिल, 2021 रोजीची पुर्वनियोजित "राष्ट्रीय लोकअदालत' होणार नाही याची  जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.

No comments