web-ads-yml-728x90

Breaking News

‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले.

No comments