0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. ही  घटना अत्यंत दुर्देवी व मनाला वेदना देणारी आहे. या घटनेचा तपास व दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.नाशिक  महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीच्या ठिकाणी भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंणगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, वैद्यकिय अधिकारी डॉ.आवेश पलोड आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top