web-ads-yml-728x90

Breaking News

खाजगी रूग्णालय हाऊसफुल सरकारी मध्ये दिशाभुल ; ग्रामीण भागात कोरोना उपौचार यंत्रणा कुचकामी

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

महाराष्ट्राच्या कानाकोपायात कोरोनाचा कहर माजला आहे.प्रत्येक गावागांवात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.महाराष्ट्र सरकार कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण ऑक्सीजन रेमडेसिवीर पुरवठा सुरळीत करण्यावर भर देवुन कोव्हीड सेंन्टर उभे करत आहे.मात्र कोव्हीड सेंन्टरच्या उदघाटण नंतर कोव्हीड सेंन्टर मध्ये एमडी फिजिशियन डॉक्टर अनुभवी कर्मचारी बेड ऑक्सीजन अँब्युलेश रेमडेसिवीर इंजेक्शन नाहीत याकडे राज्य शरकार आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे.शासनाने खाजगी रूग्णालयाना कोव्हीड सेन्टर चालवण्यासाठी परवानगी दिली त्यांना ऑक्सीजन रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाच्या आरोग्य योजनाचा लाभ दिला परंन्तु त्याच्या रूग्णालयात गरीबाना बेड मिळत नाही श्रीमंताना बेड तात्काळ मिळतो कारण गरीब रूग्णांचे नातेवार्इक त्यांचा महागडा बिल भरतात किंवा नाही याची धास्ती लागते याकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष स्थानिक पातळीवर सर्वत्र दिसुन येत आहे.ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात असणारे सावद कोव्हीड सेन्टर 400 बेडचे उदघाटण वेळी जाहिर झाले मात्र तेथे 200 रूग्णांना बेड उपलब्ध आहेत.ऑक्सीजन मिळत नाहीत अशी माहिती जिल्हयाच्या अधिकार्यांकडुन उपलब्ध होते कर्मचारी वर्ग अपुरा आहे मुरबाड शहापुर कल्याण ग्रामीण भागातील रूग्णांना बेड मिळत नाहीत त्यामुळे कोरोना उपौचार यंत्रणा कुचकामी ठरत आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयाला ऑक्सीजन मिळत नाही मुरबाड ग्रामीण रूग्णालयात 80च्यावर लेवल असणारे रूग्ण उपौचारासाठी ठेवले जातात तेथे एमडी फिजिशयन मेडीकल डॉक्टर नाही कर्मचारी डॉक्टर अपुरे आहेत बेड अपुरे आहेत त्याचा गैरफायदा खाजगी कोव्हीड सेन्टरचे डॉक्टर घेत आहेत.रिपोर्ट लवकर येत नाहीत तात्काळ प्रथम उपौचार होत नाहीत शासकीय सिटीस्कॅन मशिन नाही त्याचा गैरफायदा खाजगी एजन्शा घेत आहेत याकडे कोणाचेही लक्ष नाही.शासनाने प्रत्येक आमदाराना दिलेल्या कोव्हीड निधीमधुन सिटीस्कॅन मशिन एक्सरे मशीन उपलब्ध करून गरीब रूग्णांना न्याय दयावा स्थानिक रूग्णांसाठी 1000 बेडचे कोव्हीड रूग्णालय मुरबाड तालुक्यात उभे करावे त्यांना ऑक्सीजन रेमडेसिवीर इंजेक्शन बेड शासकीय औषधे उपलब्ध करून दयावीत शासनाने खाजगी स्वयंसेवा संस्था एनजीओ यांना कोव्हीड सेंन्टरची परवानगी देवुन त्यांना उपौचार यंत्रणा उभी करून दयावी अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑफ इंडियाने केली आहे.

No comments