web-ads-yml-728x90

Breaking News

चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरीज यांच्यासाठी ‘एसओपी’ सादर करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरीज यांनी कामाच्या वेळांची विभागणी आणि कार्यप्रणालीत बदलाची एसओपी सादर करावी. जेणेकरून या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांना कामकाज करणे सुलभ होईल. तसेच ही एसओपी इतरांनाही मार्गदर्शक ठरेल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिले.या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांच्या संघटनांच्या पदाधिकारी सदस्यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष निहार जंबुसरीया, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नागेंद्र राव, पवन चांडक, दुर्गेश काबरा, देवेंद्र देशपांडे, देबाशीष मित्रा, नितीन दोशी आदी उपस्थित होते.

No comments