web-ads-yml-728x90

Breaking News

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे गोरगरिबांना अन्नधान्य वाटप

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

लॉकडाऊन काळात गोरगरीब लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जगण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे अन्न धान्य सुद्धा नाही. अनेक गोरगरीब कामगार वर्गाजवळ पैसे तसेच अन्नधान्य नसल्याने अनेक कामगार वर्ग आपल्या गावी गेले आहेत. गोरगरिब व्यक्ती, कामगार वर्ग कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात  उपाशी राहू नये या दृष्टीकोणातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली च्या माध्यमातून उरण तालुक्यातील उरण-पनवेल मार्गांवर जे एन पी टी टाउनशिप बस स्टॉप ते नवघर फाटा बस स्टॉप दरम्यान मुख्य रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या व मोलमजुरी करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या कामगार बांधवांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.टाउनशिप बस स्टॉप ते नवघर फाटा बस स्टॉप दरम्यान झोपडपट्टीत राहणाऱ्या एकूण 23 कुटुंबांना प्रत्येकी 3 किलो तांदूळ, 2 किलो गहू, 1 किलो कांदे असे जीवनावश्यक अन्नधान्य प्रत्येकाला देण्यात आले.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,कार्याध्यक्ष -पत्रकार विठ्ठल ममताबादे,सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील, विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सदस्य -प्रेम म्हात्रे, समीर पाटील, अभय पाटील, साहिल म्हात्रे, ओंमकार म्हात्रे, आर्यन पाटील, अर्णव पाटील आदी सदस्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सोशल, फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून उपस्थित होते.यावेळी कामगार वर्गांनी संस्थेचे आभार मानले.

 

 

No comments