web-ads-yml-728x90

Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्रात शिस्टुरा हिरण्यकेशी हे जैविक विविधता स्थळ घोषित

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी”  (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसुचना महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली.यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली आहे.शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते.या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे या क्षेत्रात गवे, हरीण, बिबट, अस्वल, शेकरू, माकड, वानर, मुंगूस, साळींदर, खवले मांजर, भेकर आदी वन्यजीव आढळून येतात. तसेच साग, आंबा, किंजळ, ऐन, जांभा, उंबर, जांभूळ, अंजन, फणस अशा वृक्षप्रजाती, झाडे, झुडपे आणि वेलींचेही याभागात अस्तित्त्व आहे.

No comments