web-ads-yml-728x90

Breaking News

वसमत मॉडर्न मार्केट प्रकल्पाचे काम सुरू करण्यास तत्वत: मान्यता

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

वसमत येथे वसमत मॉडर्न मार्केट प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. टर्मिनस मार्केट स्थापन करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी निधीही मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली.मंत्रालयात सहकार व  पणनमंत्री श्री.बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.महाराष्ट्र  राज्य कृषी  पणन मंडळाने  पुढाकार घेऊन मॉडर्न प्रकल्पाचे काम लवकर  सुरू करावे अशा सूचनाही पणनमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.बैठकीला आमदार श्री.चंद्रकांत (राजू) नवघरे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ मर्या. चे अध्यक्ष श्री.जयप्रकाश रावसाहेब साळुंके (दांडेगावकर), व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, पणन विभागाचे उपसचिव वळवी, उपस्थित होते.

No comments