0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबईतील वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा प्रस्तावित बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक प्रकल्प हा मुंबईतील नवीन आकर्षण ठरणार असून विविध धर्मीय स्थळांनादेखील तो जोडणारा ठरेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना सर्व संबंधीत यंत्रणांनी योग्य ते सहकार्य करावे, असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संबंधीत यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले.या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने मंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमीत सैनी, महानगरपालिकेच्या जी / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर बैठकीत सहभागी झाले होते.

Post a comment

 
Top