Breaking News

राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अंमलबजावणी करतांना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

No comments