0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

अबोल राहून समाजासाठी काम करणाऱ्या न लिहित्या, बोलत्या माणसांच्या यशकथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करत नवी उमेदहे समाजात सकारात्मकता पसरवण्याचे व्यासपीठ बनले आहे, अशा शब्दात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.नवी उमेद या व्यासपीठाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली नवी उमेदची पाच वर्षेया ऑनलाईन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमावरुन करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी युनिसेफच्या महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, नवी उमेदच्या श्रीमती मेधा कुलकर्णी, वर्षा देशपांडे आदी उपस्थित होत्या.

 

Post a comment

 
Top