web-ads-yml-728x90

Breaking News

नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील आठ शासकीय गोदामांच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता. येवला, मौजे राजूरबाहूला ता. नाशिक, मौजे चंदनपुरी ता. मालेगाव जि. नाशिक येथील शासकीय गोदाम बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यात अन्न, धान्याची अधिक साठवणूक करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी यांनी मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता. येवला, मौजे राजूरबाहूला ता. नाशिक, मौजे चंदनपुरी ता. मालेगाव  येथील नवीन गोदाम बांधकामांच्या ०८ अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्याबाबतच दि. १५ डिसेंबर २०२० रोजी पत्रान्वये विनंती केली होती. त्यानुसार नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता. येवला, मौजे राजूरबाहूला ता. नाशिक (०३ गोदाम ), मौजे चंदनपुरी ता. मालेगाव (०२ गोदाम ) येथील ०८ गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

No comments