0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या योजनेंतर्गत दि. 15 एप्रिल 2021 पर्यंत मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात इतर राज्यातील 1474 शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटीद्वारे धान्य घेतले असून लाभार्थ्यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेची सुरुवात 2018 मध्ये Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करुन लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणीकरणाद्वारे धान्य वितरित करण्यात येते.

Post a comment

 
Top