Breaking News

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबई महानगर क्षेत्रात सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे त्यांनी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सांगितले.एमएमआर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी ठाणे,रायगड, पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेचा आढावाही घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचना श्री. शिंदे यांनी केली.

No comments