0

 


BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

जेव्हा जगावर प्रसंग येतो तेव्हा आपण देवाकडे पहातो जेव्हा देशावर प्रसंग येतो तेव्हा आपण सर्वच यंत्रणेकडे पहातो राज्यावर प्रसंग येतो तेेव्हा आपण सामाजिकतेकडे पहातो माझ्या भुमीतलावर प्रसंग आला तेव्हा माझ्या डोळयाच्या पापणीचा केस उपटला असे वाटते अशाच प्रसंगाने सध्या कोरोना आजाराने भितीचे सावट पसरले आहे.त्यासाठी ज्यांची छाया जगावर आहे त्यानी एक निमित्त म्हणुन आपल्या सेवेला पाठवलेला आपला माणुस म्हणुन कोकणाचे महामेरू आमदार किसनराव कथोरे गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी प्रसंगवादन राखून जनसामान्याच्या सेवेसाठी पुढे आले आहेत माझा माणुस माझ्या डोळयाच्या पापणीचा केस आहे तो उपटल्यास माझ्या डोळयातुन पाणी येते याची आठवण कोव्हीड काळात जोपासली जात आहे.प्रभाव कुचकामी असतो दिर्घकाळ टिकत नाही मात्र प्रकाश आखंड राहातो अशा भावनाने प्रकाशमय नेतृत्व आमदार किसनराव कथोरे यांनी मुरबाडचे कोव्हीड सेंन्टर तात्काळ सुरू करून लसीचे डोस उपलब्ध करून दिले.तात्काळ उपौचार करण्याचा डॉक्टराना सल्ला देवुन जनमानसाना छोटया व्यापार्‍याना भुकबली उपासमारी ठरणार नाही अशा लॉकडाऊन नको अशी लेखी मांगणी करून रेमडिसिविर इन्जेक्शन काळाबाजार थाबवावा मुरबाड बदलापुर शहापुर पडघा अंबरनाथ उल्हासनगर कल्याण भिवंडी संपुर्ण ठाणे जिल्हयात आरोग्य यंत्रणा सर्तक ठेवण्याच्या सुचना करून समस्याग्रस्ताना मदतीचा हात दिला आपल्यासाठी कोणाच्या डोळयात पाणी येते म्हणजे आपले जीवन सफल झाले आहे याची जाण आमदार किसनराव कथोरे यानी ठेवली आहे.रूग्णांची टेस्ट चाचणी तातडीने सुरू केल्या आहेत.प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवून प्रत्येक नागरिकानी स्वताची काळजी घ्यावी असे आहवान करून चार हजार पर्यंन्त नागरिकाना तातडीने लस देण्याचा प्रशासनाकडे केलेला प्रयत्न स्थानिकाना कोरोनाच्या भितीतुन सोडवण्याचा दिलासा दिला आहे.जिल्हापरिषद यंत्रणा ग्रामीण रूग्णालय आरोग्य यंत्रणा खाजगी डॉक्टरी यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी जनमाणसाची सेवा करत आहेत.बदलापुर कल्याण मुरबाड पडघासह कोव्हीड सेंन्टर आरोग्य यंत्रणा उभी करून देण्यासाठी आमदार किसनराव कथोरे पुढे आले आहेत.

Post a comment

 
Top