0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करणे, रुग्णालयातील रुग्णशय्यांचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज ऑनलाईन बैठकीत घेतला. या बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी हे सहभागी झाले होते.

Post a comment

 
Top