web-ads-yml-728x90

Breaking News

लसीकरणासाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहुन पुढे येत आहे ही गोष्ट भूषणावह - छगन भुजबळ

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नाशिक औद्योगिक वसाहती मधील अंबड इंडस्ट्रियल व मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), एमआयडीसी व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभे राहिलेले महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील पहिले कोरोना लसीकरण केंद्र व आरटीपीसीआर टेस्टिंग सेंटरचे आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले.दुरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या या उदघाटनावेळी श्री भुजबळ म्हणाले की सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने काही कडक निर्बंध लागू केले आहेत.या आदेशात राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांनी लवकरात लवकर केंद्र सरकारच्या नियमानुसार लसीकरण केले पाहिजे असे म्हंटले आहे. कामगारांच्या ह्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहुन पुढे येत आहे ही गोष्ट भूषणावह आहे. कोरोनाच्या या लढाईत आता फक्त सरकारवर अवलंबून न राहता सर्वच क्षेत्रातील सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी पुढे आले पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारच्या ब्रेक दि चेन या मोहिमेनुसार कोरोनाची साखळी तोडली पाहिजे पण अर्थचक्र चालु ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांचे लसीकरण देखील झाले पाहिजे.या उदघाटनावेळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार, चेअरमन धनंजय बेळे, निखिल पांचाळ, एमआयडीसीचे आरओ नितीन गवळी, डीआयसीचे जनरल मॅनेजर संतोष गवळी व सर्व उद्योजक उपस्थित होते.या कार्यक्रमावेळी चेअरमन धनंजय बेळे यांनी या लसीकरण आणि कोरोना चाचणीचा लाभ हा २५०० कारखान्यांचे कामगार व उद्योजकांना होणार आहे व यासाठी पायोनियर रुग्णालयाची देखील मदत मिळत असल्याची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे कोरोना रूग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा असोसिएशनचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. असोसिएशन घेत असलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक देखील केले. कालच नाशिक येथे मेट भुजबळ नॅालेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समता परिषद यांनी सूरू केलेल्या कोविड केअर सेंटर प्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी आता पुढे येत कोविड सेंटर सुरू केले पाहिजे.. औद्योगिक क्षेत्रातील मंडळींना हे सहज शक्य आहे त्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून सर्वांनी पुढे यावे असे आवाहन देखील श्री भुजबळ यांनी यावेळी केले...

No comments