मुरबाड तालुक्यातील डॉक्टर जितेंद्र बेंढारी यांचे तन्मय हॉस्पिटल ठरतोय रूग्णांचा आधारवड
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे
कोरोनाचा महाकाळ हा एक भयानक काळ सध्या वावरत आहे.अशाच कोरोनाच्या प्रादुर्भावात 24 तास रूग्णांच्या सेवेसी तत्पर असणारे नामांकित अनुभवी मुरबाडचे डॉक्टर जितेंद्र बेंढारी हे आपली भुमिका आजही चांगल्या पध्दतीने बजावत आहेत.कोणाचा काही भरवसा नसतांना आपण आपली काळजी घ्यावी असे रूग्ण व नागरिकांना वारंवार मार्गदर्शन करून विविध आजारावर मात करण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे.मुरबाड तालुक्यात बरेच दवाखाने उदयास आले आहेत मात्र एकमेव तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल नर्सिंग होम हे खया अर्थाने रूग्णांची सेवा करत आहेत.मुरबाड तालुक्यात एकमेव स्त्री रोग तज्ञ असलेले डॉ जितेंद्र बेंढारी हे मुरबाडकरांना लाभल्याने त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुकाची छाप पाहण्यास मिळत आहे.गोरगरीब व आदिवासी जनतेला मदत करणे त्यांच्यावर चांगल्या पध्दतीचे उपचार करणे हा एक मानस मात्र एकमेव डॉ.जितेंद्र बेंढारी यांच्या तन्मय हॉस्पिटल मध्ये आहे.सुसज्ज बेड सुविध्दा एकाच छताखाली सोनोग्राफी सेन्टर बालरोग तज्ञ असलेला हा एकमेव महिलांच्या सांधीतील हॉस्पिटल आहे.दिवस रात्र 24 तास सेवेस तत्पर असलेले डॉ.जितेंद्र बेंढारी हे देव माणुसच म्हणावे लागेल अशा प्रतिक्रिया येथील जनतेमधुन उमटत आहेत.सध्या गर्भवती महिलांना काळजी घेण्याची अवश्यक्यता असतांना डॉ.जितेंद्र बेंढारी हे त्यांच्या सेवेसी असल्याने महिलांच्या प्रसुतीविषयी प्रश्न गंभीर आता राहिला नाही.रात्र असो किंवा दिवस डॉ.जितेंद्र बेंढारी हे सदैव रूग्ण नागरिक यांच्या मदतीला धाऊन येत असुन आता दैवरूप म्हणुन सध्या त्यांच्या कार्यात दिसून येत असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांच्या गंभीर आजारावर त्यांचे उपचार आणि रोगाचे निदान वेळीच उपचार केले जात आहे त्यामुळे डॉ.जितेंद्र बेंढारी यांचे कौतुक होत आहेत.
No comments