web-ads-yml-728x90

Breaking News

जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यांत येतो. परंतु राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार ठाणे जिल्हयांतील सोमवार दिनांक 3 मे 2021 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे.असे  ठाणे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) बाळासाहेब वाकचौरे यांनी कळविले आहे.

No comments