web-ads-yml-728x90

Breaking News

ई-ऑफिस प्रणाली वापरण्यास सोपी आणि सुलभ असावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

माहिती तंत्रज्ञान विभागाने ई-ऑफिस  प्रणाली अधिक सोपी, सुटसुटीत आणि वापरण्यास सुलभ करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्यासमोर ई-ऑफिस प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, संचालक माहिती तंत्रज्ञान श्री. रणजित  कुमार आदी  अधिकारी उपस्थित होते.

No comments