४५ मेट्रिक टन द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनच्या ३ टँकरसह ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोलीमध्ये दाखल
BY - युवा महाराष्ट्र लाइव – रायगड
राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे.या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ४५ मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या ३ टँकरसह ही “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोली येथे दाखल झाली.विशाखापट्टणम् येथून वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेल मधील कळंबोली येथून 10 ट्रकची “ऑक्सिजन एक्स्प्रेस” परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१९ एप्रिल २०२१ रोजी रवाना करण्यात आली होती. आज ही “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोलीमध्ये दाखल झाल्यामुळे कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.काल सायंकाळी ६.०० वाजता जामनगर येथून निघालेली ही एक्सप्रेस आज सकाळी ११.३० च्या सुमारास कळंबोली रेल्वे स्थानकात दाखल झाली.जामनगर येथून निघालेल्या या “ऑक्सिजन एक्सप्रेस” मधील 10 टँकरपैकी 3 टँकर हे नागपूर येथे, ४ टँकर हे नाशिक येथे आणि उर्वरित ३ टँकर हे कळंबोली, पनवेल येथे उतरविण्यात आले.
No comments