web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोनाविरुद्धच्या लढाईत चित्रपट उद्योगाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

लॉकडाऊनचा निर्णय घेऊन कुणाचीही रोजी-रोटी थांबवणे हा राज्य शासनाचा उद्देश नाही. परंतू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढ रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावा लागल्यास त्याच्या अंमलबजावणीसाठी चित्रपट उद्योगाने राज्य शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही प्रत्येक पावलावर राज्य शासनासोबत आहोत, अशी ग्वाही चित्रपट उद्योगाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली.मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माता संघटना तसेच वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, ज्येष्ठ निर्माता महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, मनोज जोशी, सुबोध भावे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर यांच्यासह विविध चित्रपट निर्माता संघटनांचे प्रतिनिधी आणि मराठी, हिंदी वाहिन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


No comments