0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाणे शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते हरिश्चंद्र गंगाराम जाधव यांचे सोमवार 5 एप्रिल रोजी सकाळी ठाण्यातील इस्पितळात अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात वृत्तपत्र विक्रेते संतोष जाधव व संदीप जाधव अशी मुले, पत्नी, सुन व नात असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघ आणि सुधागड तालुका रहिवासी सेवा, ठाणे यांनी शोक व्यक्त केला आहे.ठाण्यातील अल्मेडा सिग्नल परिसरात गेली 20 वर्षे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे हरिश्चंद्र जाधव हे सामाजिक क्षेत्रातही सुपरिचित होते. ज्येष्ठ मुलगा संतोष जाधव यांच्या वृत्तपत्र विक्रीसाठी त्यांनी अहरोत्र मेहनत घेत चरई परिसरात वृत्तपत्र विक्री क्षेत्रात त्यांनी चांगला जम बसविला. मितभाषी आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाशीही त्यांची नाळ जुळली होती. अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात ते सहभागी होत असत. त्यांच्या निधनाने सुधागडवासियांसह वृत्तपत्र विक्रेता क्षेत्रातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a comment

 
Top