web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई शहर कामगार उपायुक्तांमार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

आंतरराज्य, स्थलांतरित कामगार, असंघटित कामगार वर्गासाठी  मुंबई शहर कामगार उपायुक्त यांच्यामार्फत कामगारांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर कामगार विभागामार्फत चाइल्डलाईन या अशासकीय संस्था व पिरॉमिल ग्रुपच्या सहकार्यातून सहाय्यता कक्षामार्फत नास्ता पाकिटे व पाणी इत्यादी गरजेच्या वस्तुंचे स्थलांतरित कामगारांना वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाला कामगार उप आयुक्त संकेत कानडे, सहायक कामगार आयुक्त सुनिता म्हैसकर व  सहायक कामगार आयुक्त नितीन कावले उपस्थित होते.मुंबई शहराच्या कामगार उप आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे, अपर कामगार आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर जिल्हा कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत कामगारांना सहाय्य करण्याकरीता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकारी यांचे दूरध्वनी/मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

No comments