0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

शिक्षण, आरोग्य आणि गुन्हे यासंदर्भात संबंधित प्रदेशातील  स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या संस्थांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे असून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.शहरी शासन सबलीकरणासंदर्भात प्रजा संस्थेने देशभरातील विविध राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा अभ्यासपूर्ण सर्व्हे केला आहे.  यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  शिक्षण, आरोग्य आणि गुन्हे याबाबत वारंवार भेडसावत असलेल्या समस्यांवर उपाय म्हणून  स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित कर्मचारी यांचे तांत्रिकदृष्ट्या सबलीकरण होणे गरजेचे असून, त्यासंदर्भात प्रजा या सामाजिक संस्थेच्या वतीने आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संस्थेच्या प्रियांका शर्मा यांनी सादरीकरण केले.

Post a comment

 
Top