0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे 11 एप्रिल 2021 रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससीमार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील  मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहेही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Post a comment

 
Top