web-ads-yml-728x90

Breaking News

जल वाहतुकीतील प्रवाशांसाठी विमा पॉलिसीची काटेकोर अंमलबजावणी करावी – बंदरे विकास मंत्री अस्लम शेख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र सागरी मंडळा (मेरी टाईम बोर्डा)च्या ७५ व्या बैठकीत सन २०२१ – २२ या वर्षाच्या आर्थिक ४७३ कोटी ९६ लाख ४७ हजार इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. राज्यातील लहान बंदरामधील प्रवासी जलवाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासी विमा पॉलिसीची काटेकोर अंमलबजावणी जलयान मालकांनी करावी, असे निर्देश श्री. शेख यांनी यावेळी दिले.सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस बंदरे विकास राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार, बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. आशिषकुमार सिंह, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. अमित सैनी, आमंत्रित सदस्य भारतीय नौसेनेचे प्रतिनिधी, तटरक्षक दलाचे प्रतिनिधी कमांडट आदी उपस्थित होते.

No comments