0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु, या प्रकरणात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार श्री. रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश आज जारी करण्यात आले.कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण आणि अनुषंगिक तक्रारीप्रकरणी राज्य शासन अत्यंत गंभीर आहे. असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नसून दोषी असणारी व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी कठोर कारवाईपासून सुटू शकणार नाही हे ध्यानात घ्यावे, असेही मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या.ॲड. ठाकूर यांनी काल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेऊन श्रीमती दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर झालेल्या कारवाईप्रमाणेच श्री. रेड्डी यांच्यावरही कारवाई करून निलंबित करण्याची मागणी केली होती.

Post a comment

 
Top