web-ads-yml-728x90

Breaking News

2 कर्मचार्‍यांना लाच घेतांना लाचलुचपत विभागाने पकडले रंगेहात...

BY - युवा  महाराष्ट्र  लाइव –  कल्याण

कोरोनाचा एकीकडे प्रादुर्भाव असताना दुसरीकडे भ्रष्टाचार काही कमी होण्याचा नाव घेत नाही परंतू कोरोना प्रदुर्भावातही पोलिस प्रशासन गैरकारभार व लाच घेणार्‍यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे हे पुन्हा लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांनी सिध्द केले आहे.येथिल भुमिअभिलेख कार्यालयातील दोन सर्वेअरला जमिन मोजणी संदर्भात "क" प्रत देण्यासंदर्भात लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.तक्रारदार गोवेली व रायता कल्याण येथिल असून त्यांच्या जमिनीची मोजणी करून "क" प्रत देण्याकरिता 2 लाखाच्या लाचेची मागणी भुमिअभिलेख कार्यालयातील लोकसेवकांनी केली होती त्यानुसार तक्रारदार यांनी ठाणे कार्यालयात समक्ष हजर राहून  25/03/2021 रोजी तक्रार दिली असता परिपुर्ण विषय सांगितले असता 16/04/2021 रोजी पडताळणीदरम्यान तडजोडीने 1 लाख 80 हजार रूपये भुमिअभिलेख दोन्ही लोकसेवक यांनी मान्य केले त्यावरून सापळा रचण्यात आलेल्या पथकाने भुमिअभिलेख लोकसेवक भुषण गिरासे यास 1 लाख 50 हजार व चंद्रशेखर अहिरराव यास 30 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे.सदरहू  प्रतिबंध विभाग ठाणे पोलिस उपअधिक्षीक निलीमा कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली पथकांनी सापळा रचून संबंधित लाच घेणार्‍या त्या 2 लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

No comments