web-ads-yml-728x90

Breaking News

महसुल वसुलीसाठी थेट गोदाम जप्त भिवंडी प्रांतअधिकारी डॉ.मोहन नळदकर व तहसिलदार अधिक पाटील यांची धडक कारवाई

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी ,ठाणे

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भिवंडी तालुक्यासाठी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी जमीन महसुलाचे 95 कोटी रूपये तर गौणखनिज उत्पन्न 15 कोटी 50 लाख वसुलीचा इष्टांक देण्यात आलेला आहे.या वसुलीसाठी दिलेल्या इष्टांक वसुलीची कार्यवाही 31 मार्च 2021 अखेरपुर्ण करण्यासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर व तहसिलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व 5 मंडळ अधिकारी व 36 तलाठी कार्यालये व कर्मचार्‍यांनी संपूर्ण तालुक्यात शासकीय वसुलीची धडक कार्यवाही सुरू केली आहे.तालुक्यातील ज्या खातेदाराना मागील वर्षापर्यंत शासनास देय असलेल्या रक्कमा अदा केलेल्या नाहीत अशा खातेदारांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.त्यामध्ये अपर मंडळ अधिकारी भिवंडी चंद्रकांत राजपूत मंडळ अधिकारी खारबाव टाकवेकर व मंडळ अधिकारी पडघा किरण केदार यांची वसुली सर्वात जास्त असल्याचे सुत्रांकडुन समजते. महसुल वसुलीसाठी थेट गोदाम जप्तीची कारवाई सुरू केल्याने गोदाम मालकांमध्ये खळबळ माजली आहे.तसेच ज्या गोदाम मालकासह नागरिकांची शासकीय शुल्क भरणे बाकी आहे.त्यांनी लवकरात लवकर जमा करावी अन्यथा कारवाई अधिक तीव्र करण्यात येल अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांत अधिकारी डॉ.मोहन नळदकर व तहसिलदार अधिक पाटील यांनी आमच्या वृत्तवहिनीशी बोलतानी दिली आहे.

No comments