web-ads-yml-728x90

Breaking News

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांविरोधात थेट हक्कभंग दाखल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून सभागृहात अभ्यासपूर्ण मांडणी करुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता आणखी एक हत्यार उपसले आहे. कालपर्यंत सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या फडणवीस यांनी आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या हल्ल्याने अगोदरच बेजार झालेल्या महाविकासआघाडीच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

गृहमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सभागृहात माझ्याविरोधात धादांत खोटी माहिती दिली. अन्वय नाईक हे प्रकरण मी दाबलं, असा उल्लेख त्यांनी केला. मी त्यांना यासंदर्भातील सुप्रीम कोर्टाचा आदेश दाखवला होता. मी पॅराग्राफ वाचून दाखवला. 306 नुसार ही केस होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. तरीही अनिल देशमुखांनी सभागृहात माझ्यावर आरोप केले. हा माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. गृहमंत्र्यांनी खोटं बोलून माझ्या विशेष अधिकाराचं हनन केलं. त्यामुळे आपण त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

No comments