web-ads-yml-728x90

Breaking News

डायलिसीसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. एखादा रुग्ण शासकीय रुग्णालयात आल्यावर तिथल्या वातावरणाने त्याला प्रसन्न वाटले पाहिजे, अशाप्रकारे आरोग्य संस्थांचा कायापालट करणार असून डायलिसीसची सुविधा सामान्यांच्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.जागतिक मुत्रपिंड दिनानिमित्त ॲपेक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, ॲपेक्स फाऊंडेशनचे डॉ.श्रीरंग बिच्चू आदी मान्यवर सहभागी झाले होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोना रुग्णांना डायलिसीसची सुविधा देण्यासाठी ॲपेक्स फाऊंडेशनच्या मदतीने मोलाचे सहकार्य मिळाले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांची सेवा करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी हे देवदूत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.जगण्याच्या शर्यतीत माणसाला स्वत:च्या आरोग्याचा विसर पडतो. माणूस जगण्यासाठी मर मर करतो त्यामुळे जीवनशैली आणि दिनचर्या बदलतो यातून निसर्गचक्र बदलल्यामुळे मुत्रपिंड, हृदय विकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे दैनंदिन आयुष्य जगताना आरोग्य जपा असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

No comments