web-ads-yml-728x90

Breaking News

प्रत्येक तालुकास्तरावर २० ते २५ ऑक्सीजन बेड तयार ठेवा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांकरिता सद्या ऑक्सीजन बेडची संख्या पर्याप्त असली तरी पुढील लाटेत दररोजची रूग्णसंख्या 500 च्या वर गेल्यास आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करण्याची गरज असून प्रत्येक तालुकास्तरावरदेखील 20 ते 25 ऑक्सीजन बेड तयार ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आ. सुधीर मुनगुंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, प्र. जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments