0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृती आराखड्यातील शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वसमावेशक सक्रिय सहभागाची गरज असून त्यादृष्टीने प्रशासनाने याबाबत कृती आराखडा तयार करुन कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.. नीलम गोऱ्हे यांनी दिले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृती आराखड्यातील शाश्वत विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सादरीकरण केले. उच्च व तंत्र शिक्षणचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता यांनीही सादरीकरण केले. पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन यावेळी उपस्थित होते.उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, गरिबी निर्मूलन करणे, भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे, आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे गरजेचे आहे. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही कृतीदर्शक आराखड्यातील उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी समूहाने काम करणे गरजेचे आहे. प्रशासनाने यासंदर्भात कृती आराखडा तयार करावा याद्वारे महाराष्ट्र देशातील पहिले कृतीदर्शक राज्य ठरेल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

 

Post a comment

 
Top