web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबईतील लोकल प्रवासावर निर्बंध येणार का?

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यात कोरोनाचा (Corona) विस्फोट होत असून मुंबईतही करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा संसर्ग रोखता यावा यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. आज मुंबई महापालिकेने होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र एवढं करूनही नजिकच्या काळात रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास राज्य सरकार मुंबईच्या लोकल प्रवासावर काही निर्बंध आणण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत. मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. करोना रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत. लोकांनी मास्कचा वापर करणे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे. पण तर लोकांनी नियम पाळले नाहीत, तर मात्र लोकलबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात लॉकडाउन लागू होईल या या प्रश्नाचे उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, लॉकडाउन हा शेवटचा पर्याय आहे.

No comments