web-ads-yml-728x90

Breaking News

कोकणातील युवकांनी शेतीची कास धरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना ,मालोंड- मालडी कोल्हापुरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष समिधा नाईक, खासदार सर्वश्री विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, रोहयो व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, आंगणेवाडी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर आंगणे, बिळवस-आंगणेवाडीचे सरपंच मानसी पालव, मालडीचे सरपंच संदीप आडवलकर, कुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडे, श्री. वडाळकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, रत्नागिरी, श्री. देवशेट्टे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, अंबडपाल व फोंडाघाट आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments