web-ads-yml-728x90

Breaking News

श्री दत्तगुरु प्रतिष्ठान तर्फे चोरंग काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि दिवाळी अंक स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...!

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

श्री दत्तगुरु प्रतिष्ठान ही संस्था गेली १० वर्षे सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीवपणे कार्य करत आहे. आतापर्यंत अनेक उपक्रम राबवून ते यशस्वी सुद्धा केले आहेत त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा प्रथमच राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. सस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लकेश्री यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकपर भाषण करून संस्थेच्या १० वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. शशिकांत सावंत यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे यांनी आलेल्या दिवाळी अंकाचे परीक्षण केले. यात प्रामुख्याने प्रथम क्रमांक  - पोर्ट ट्रस्ट कामगार (संपादक - एस के शेट्ये, मारुती विश्वासराव), व्दितीय क्रमांक  - कलामंच (संपादिका - श्रीमती हेमांगी नेरकर), तृतीय क्रमांक - स्नेहदा (संपादक - उमाकांत सावंत), विशेष पुरस्कार - चोफेर साक्षीदार  (संपादक सत्यवान तेटांबे), आणि दक्षता (संपादिका श्रीमती शीला साईल), उत्तेजनार्थ पुरस्कार - गमभन (संपादक दत्ता मानकुरे), उल्हास प्रभात (संपादक डॉ.गुरुनाथ बनोटे) आणि  लोकनिर्माण (संपादक बाळकृष्ण कासार) यांना माता सुगंधाबाई शंकरराव लकेश्री यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच  उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र म्हणून जनता एक्सप्रेस (संपादक - मोहिददीन जमीर उददीन सितारी) आणि शब्दराज (संपादक - विवेक विजयकुमार मुंदडा) यांचा गौरव करण्यात आला  यावेळी साहित्यिक-कवी व वात्रटिका फेम ज्ञा.ग.चोधरी यांच्या " चोरंग " या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि कवी चोधरी यांचा सत्कार करण्यात करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आमदार मधू अण्णा चव्हाण, ज्येष्ठ वृत्त पत्रलेखक ज्ञा.भि.गावडे, निवृत्त पोलीस अधिकारी लियाकत सय्यद, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर सो.रेवती आलवे, मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर यांच्या हस्ते दिवाळी अंकांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि मधुसूदन सुगदरे, दिलीप शेडगे, संजय म्हात्रे, प्रकाश बडगुजर यांचा साहित्यिक-कवी-मुक्त पत्रकार व वृत्तपत्रलेखक डॉ.अशोक दांडेकर, कृष्णा काजरोळकर, भाई नार्वेकर, रामबंधू अढांगळे, राकेश चंद्रा, उमेश जामसंडेकर, राजेश्वर जोगु, अहमद शेख, डी.एस.पाटील, बाबी तळेकर, आनंद मुसळे, अविनाश परब, गणेश नेतीकर, ठेड बाबू, धनंजय कोरगावकर, अशोक परब, गजानन महाडिक, गंगाधर पोता, फिरोज शेख, तसेच हमारी सहेली च्या अध्यक्षा श्रीमती मुंबादेवी कानडे आदी ५० जणांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी संस्थेचे चिटणीस दत्त मुलुख यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.        

 

No comments