web-ads-yml-728x90

Breaking News

पत्रकाराला धमकी देणार्‍या रविंद्र पाखरे यांच्यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री यांच्याकडुन गृहमंत्रालयाला आदेश तात्काळ गुन्हा नोंदवा पत्रकार संघटना

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांना भिवंडी शांतीनगर पोलिस ठाणे भिवंडी येथील रविंद्र पाखरे व त्यांचे सहकार्‍यानी धमकी दिल्या प्रकारणी संपुर्ण देशभरातील पत्रकार सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी निर्षेध करून केंन्द्र तसेच राज्य सरकार प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकरी मानवी हक्क आयोग यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी सदर धमकी प्रकाराची दखल घेवुन गृह विशेष विभागाला कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.गृहविभागानी पाठवलेले कारवाईचे आदेश अनेक वेळा पोलिस ठाण्यात पडुन राहातात असे प्रकार घडु नयेत अशी विनंती पत्रकार संघटनानी शासनाला केली असुन येत्या दोन दिवसात रविंद्र पाखरे व इतर यांच्यावर गुन्हां दाखल झाला नाही तर पत्रकार उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतील त्यामध्ये सामाजिक संघटना सुध्दा सहभाग घेतील असा इशारा देण्यात आला आहे.मुख्यमंञ्यानी पत्रकाराला दिलेल्या धमकीची दखल घेतल्याने पत्रकारानी मुख्यमंत्री व त्यांच्या कार्यालयाचे आभार मानले असुन जलद गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.

No comments