web-ads-yml-728x90

Breaking News

कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संदीप राठोड, हाफकिन इन्स्टिट्यूटच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.उषा पद्मनाभन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

No comments