web-ads-yml-728x90

Breaking News

‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी मुंबई शहरास बाल कामगार बाल भिक्षेकरी, बालकांचे शोषण व रस्त्यावरील मुले या बालकांच्या समस्यांतून मुक्त करण्याबाबत अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या दालनात ‘मुंबई आमची बाल मित्रांची’ या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते झाले.प्रतिकुल परिस्थितीमध्ये, असुरक्षित, हरवलेली आणि सापडलेली अशा मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी मुंबई येथे मैत्रीपूर्ण ठिकाणे या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मुंबई शहराला अशा मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाण बनविणे आहे, असे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितले.ही मोहीम बाल कामगार, बालकांचे लैंगिक शोषण, भीक मागणे, असुरक्षित हरवलेली आणि सापडलेल्या मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाणे बनविणे व त्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामाची व्याप्ती वाढविणे यावर आधारित असल्याचे श्री.निवतकर यांनी सांगितले.

 

No comments